
मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न केल्याचा फटका दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बसला असेल तर त्याचीही समीक्षा करू, असे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे. भाजपने दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, असे आव्हान मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भाजपला दिले होते. याविषयी बोलताना पात्रा म्हणाले, उमेदवार जाहीर न करण्याचा पक्षाचा निर्णय होता. निकाल जाहीर झाल्यावर सर्व बाबींचा विचार करण्यात येईल, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न केल्याच्या कारणामुळे पक्षाला नुकसान झाले तर त्याची समीक्षा करण्यात येईल.
एक्झॅक्ट पोलची वाट पाहू
एक्झिट पोल आणि अंतिम निकाल यामध्ये मोठा फरक असेल, त्यामुळे भाजप एक्झॅक्ट पोलची प्रतीक्षा करेल. दिल्लीतील निवडणुकीमध्ये भाजप जिंकेल, असे म्हणत केंद्रीय मंत्री प्रकाश जाकडेकर यांनी आम आदमी पक्षाचा एक्झिट पोलमधील विजय नाकारला आहे.
भाजपच्या बैठकीत प्रदीर्घ विचारमंथन
दिल्ली भाजप प्रदेश कार्यालयात शनिकारी रात्री ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. निकडणुकीबाबत रात्री उशिरापर्यंत मंथन सुरू होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस बी. एल. संतोष, निवडणूक प्रभारी प्रकाश जाकडेकर आदी नेत्यांनी मतदारसंघनिहाय मतदानाचा आढावा घेतला.
आप आणि काँग्रेस एकत्र येणार?
दिल्लीत काँग्रेस क आम आदमी पार्टी एकत्र येणार की नाही, हे निकालावर अवलंबून आहे. एकदा निकाल हाती आल्यानंतरच आम्ही याबाबत विचार करू शकतो, असे प्रतिपादन काँग्रेस नेते पी.सी. चाको यांनी दिले. एक्झिट पोलनुसार दिल्लीत पुन्हा आम आदमी पार्टीचेच सरकार येणार असल्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसला किमान 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीकर काँग्रेस नेते पी.सी. चाको यांनी काँग्रेस व आम आदमी पार्टीच्या युतीचे संकेत दिले आहेत.

























































