कन्हैया कुमारच्या ताफ्यावर पुन्हा दगडफेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार याच्या ताफ्यावर बिहारमध्ये पुन्हा हल्ला झाला आहे. कन्हैया कुमारच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आली असून काही गाड्यांचे नुकसान झाले आहे. कन्हैया कुमार बिहार मधील आरा येथील रमना मैदानात जात होता. त्यावेळी त्या गावातील लोकांनी त्याच्या गाडीवर दगडफेक केली. यात तीन गाड्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

याआधी बुधवारी कन्हैया कुमारच्या ताफ्यावर बिहारमधील सुपौल येथे हल्ला झाला होता. सुपौलमध्ये एका सभेला संबोधित करून सहरसाकडे जात असताना अज्ञातांनी त्याच्या ताफ्यावर दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये गाडीच्या काचा फुटल्या असून कन्हैया कुमारच्या गाडीचा ड्रायव्हर जखमी झाला होता.