Video – बिअरमध्ये पाल पडली, तोंडाने कृत्रिम श्वासोच्छवास देऊन जीव वाचवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाल म्हटली की अनेकजणांच्या अंगावर काटा येतो, काही जण भीतीने पलंगावर चढतात तर काही जण पाल दिसली की तिथून धूम ठोकतात. महिलांप्रमाणे असंख्य पुरुषही या चतुष्पाद प्राण्याला प्रचंड घाबरतात. मात्र एकाने पालीचा जीव वाचवायला तिला कृत्रिम श्वासोच्छवास देऊन जीवदान दिले.

ब्रेट नावाच्या एका व्यक्तीला त्याच्या बिअरच्या ग्लासामध्ये पाल पडलेली दिसली. सुरुवातीला त्याला वाटलं की वेटरने त्याच्यासोबत गंमत केलीय. मात्र जेव्हा वेटरनी त्याला सांगितलं की त्यांनी त्याच्यासोबत गंमत केलेली नाहीये, आणि पाल बिअर दिल्यानंतर त्यात पडली आहे तेव्हा ब्रेट अस्वस्थ झाला. बिअरमध्ये पडल्याने पाल अर्धमेली झाली होती. ब्रेटने तिला बाहेर काढलं आणि तिच्या छातीवर बोटाने दाब द्यायला सुरुवात केली. त्याचा परिणाम होत नसल्याचे पाहून ब्रेटने पालीच्या तोंडामध्ये जोरजोराने फुंकर मारायला सुरुवात केली. यानंतर पालीने हालचाल करायला सुरुवात केली. माणसाला अशाच पद्धतीने कृत्रिम श्वासोच्छवास देऊन त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो. या पद्धतीला CPR असं म्हटलं जातं.ब्रेट पालीला कृत्रिम श्वासोच्छवास देत असताना त्याच्या मित्राने ही घटना चित्रीत केली होती.