पौरुषत्व वाढविण्यासाठी त्याने खाल्ला जिवंत बेडूक, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पौरुषत्व वाढविण्यासाठी बरेच पुरुष विविध प्रकारची औषधं घेत असतात. मात्र चीनमध्ये एका तरुणाने पौरुषत्व वाढविण्यासाठी चक्क जिवंत बेडूक खाल्ल्याचे समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील चीनमध्ये व्हायरल झाला आहे.

हा तरुण चीनमधील एका प्राणी बाजारात जाऊन एक बेडूक विकत घेतो व तिथेच उभा राहून तो बेडूक जिवंत खातो. त्याचा हा प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बेडूक खाल्ल्याने पौरुषत्व वाढते असा समज चीनमध्ये आहे.

चीनमध्ये साप, कासव, बेडूक, वटवाघूळ, गांडूळ, किडे असे प्राणी खाल्ले जातात. सध्या चीनमध्ये कोरोना व्हाचरस सारखा भयंकर आजार पसरला आहे. हा आजार वटवाघूळ खाल्याने पसरल्याचे बोलले जात आहे. या आजारामुळे आतापर्यंत 2000 नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर 75 हजारहून अधिक जणांना याची लागण झाली आहे.