मुंबईत गारवा, तापमानात 6 अंशांची घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील आठवडाभर 36 ते 38 अंशांची रखरख सोसलेल्या मुंबईत रविवारी सायंकाळी थंड वारे वाहू लागले होते. तापमानात अचानक सहा अंशांनी घट होऊन हवेत गारवा परतला. त्यामुळे मुंबईकरांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला. गेल्या आठवडय़ात मुंबईचे तापमान अचानक 38 अंशांच्या उच्चांकी पातळीवर गेले होते. आठवडाभर हे तापमान 36 ते 38 अंशांच्या आसपास राहिले. रविवारी कुलाबा आणि सांताक्रूझमध्ये कमाल तापमानात सरासरीपेक्षा 6 अंशांची घट होऊन ते 32 अंश इतके नोंद झाले.