
मोटारसायकल मागीतली असता भावाने ती दिली नाही. म्हणून रागाच्या भरात मोटारसायकल जाळून टाकल्याची घटना लातूर तालूक्यातील गातेगाव येथे घडली.
मच्छिंद्र शेषेराव बनसोडे यांची मोटारसायकल लहान भाऊ विठ्ठल याला वापरण्यासाठी दिलेली होती. 3 मार्च रोजी रात्री 10.30 वाजता फिर्यादीचा दुसरा भाऊ दत्ता शेषेराव बनसोडे हा बाहेरुन घरी आला. त्याने भाऊ विठ्ठल याला मोटारसायकलची चावी मागीतली. मात्र त्यास मोटारसायकल देण्यास नकार दिल्याने तू मोटारसायकलची चावी कशी देत नाहीस म्हणून दत्ता याने मोटारसायकची पेट्रोलची नळी उपसून काढली, पेट्रोल सोडून दिले व मोटारसायकल जाळून टाकली. सुमारे 40 हजार रुपयांची मोटारसायकल जाळून टाकल्याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन दत्ता शेषेराव बनसोडे याच्या विरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.


























































