कोरोना झालाय सांगून सुट्टी घेतली! कर्मचाऱ्य़ाला 3 महिन्यांचा तुरुंगवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस जगात पसरला आहे. जगात आतापर्यंत 1 लाख 98 हजार 521 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 7 हजार 988 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. जगभरात आतापर्यंत 82 हजार 763 रुग्ण बरेही झाले आहेत. असे असले तरी ऑफिसला दांडी मारण्यासाठी एका कर्मचार्‍याने कोरोना झाल्याचा बनाव केला. पण हे त्याच्या अंगलट आल्यामुळे त्याला तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली.

चीनमधून कोरोना व्हायरस पसरला होता. अनेक लोकांचे प्राण गेले होते. आता चीन त्यातून सावरतोय. तेव्हा एका चीनमध्ये ऑफिसला जायचा कंटाळा आला म्हणून आपल्याला कोरोनाची लागण झाली अशी थाप मारली. त्यामुळे ऑफिसमध्ये एकच खळबळ उडाली. संपूर्ण कार्यालय साफ करण्यात आले. संपूर्ण कामकाज तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आले. तसेच सर्व कर्मचार्‍यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.

नंतर या व्यक्तीची विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्याने सांगितले की आपण मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी गेलो असता एका कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलो. तेव्हा आपल्याला कोरोनाची लागण झाली. परंतु त्याच्याकडील सामान घेतल्याचा पावत्या खोट्या निघाल्या. तसेच तो खोटं बोलत आहे हे तपासादरम्यान स्पष्ट झाले. म्हणून पोलिसांनी खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी त्याला तीन महिन्यांसाठी तुरुंगात पाठवले.

हिंदुस्थानात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. हिंदुस्थानात कोरोना रुग्णांची संख्या 147 असून त्यात 25 परदेशी रुग्णांचा समावेश आहे. तर सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 38 वर पोहोचली आहे. त्यात दिल्ली, महाराष्ट्र आणि हरयाणात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.