चंद्रपूर – बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

चंद्रपूर इथून 20 किमीवर असलेल्या बोर्डा येथील महिला निवृत्ता मांडवगडे (42) ही मोहफुले वेचण्यासाठी लगतच्या जंगलात गेली असता बिबट्यानं हल्ला करून तिला ठार केलं. आजूबाजूला गावातील लोक होते, पण ते मदतीला येईपर्यंत ही महिला मृत्युमुखी पडली होती. बोर्डा जंगलातील कंपार्टमेंट 419 मध्ये घटना घडली.

या गावातील नागरिक नेहमीच या दिवसात मोहफुले वेचण्यासाठी जंगलात जात असतात. या जंगलात वाघ, बिबटे, अस्वलींचा वावर आहे. मात्र तरीही जोखीम पत्करून लोक जंगलात जातात. त्यातूनच ही घटना घडली.