
लॉक डाऊनमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यास तक्रार करण्यासाठी महावितरणने नवी सेवा सुरू केली आहे. त्यानुसार ज्या ग्राहकाचा मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदणीकृत आहे, त्याच मोबाईलवरून 022 41078500 या क्रमांकावर मिस्ड कॉल करणे आवश्यक आहे. त्यानंतर तक्रार प्राप्त झाल्याचा एसएमएस ग्राहकाला सदर क्रमांकावर येईल. तर एसएमएसने वीज पुरवठा खंडित असल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहकाला कोणत्याही मोबाईल क्रमांकावरून (NO POWER स्पेस आणि बारा अंकी ग्राहक क्रमांक) असा एसएमएस 9930399303 या क्रमांकावर करावा लागणार आहे.



























































