एक जग एक लढा… कोरोनाला हरवूया! लेडी गागा, प्रियांकाची लढवय्या शिलेदारांसाठी कॉन्सर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lady-gaga

कोरोना विरोधातील लढ्यात आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन सेवेतील कर्मचारी हे खरे शिलेदार आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरातील कलाकार ऑनलाईन कॉन्सर्टसाठी एकत्र आले आहेत. अमेरिकन पॉप सिंगर लेडी गागाने ’वन वर्ल्ड – टुगेदर ऍट होम’ या लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन केले. तिने ’ए लव्ह लेटर’असं नाव देऊन जगाला खास संदेश दिला.

लेडी गागाच्या या कृतज्ञता आणि निधी गोळा करण्याच्या मोहिमेत हॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीज पुढे आले आहे. बॉलिवूडमधील प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खान हेदेखील या कॉन्सर्टचा भाग आहेत. लॉकडाऊन असल्यामुळे कलाकारांनी आपापल्या घरांतून गाणी गायली. द रोलिंग स्टोन्स या ब्रिटीश ब्रँडच्या सदस्यांनी चार वेगवेगळ्या ठिकाणावरून एकत्र येत गाणे म्हटले. प्रियांका चोप्राने जगभरातील रेफ्युजी कॅम्पच्या दयनीय अवस्थेकडे सर्वांचे लक्ष वेधले. रेफ्युजी कॅम्प मी बघितली आहेत. तिथे भरपूर गर्दी आहे. मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अशा कॅम्पमध्ये स्वच्छ पाणी, सॅनिटेशन आणि आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, असे मत या कॉन्सर्टच्या निमित्ताने प्रियांकाने व्यक्त केले.