
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून हिंगोली येथील सदभाव सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभय भरतीया यांच्या पुढाकाराने 27 एप्रिल रोजी तिरुपतीनगर भागात आयोजित रक्तदान शिबीरामध्ये 52 रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
हिंगोलीत कोरोनाचे 11 रुग्ण आढळुन आले आहेत. महाराष्ट्र शासन व जिल्हा आरोग्य प्रशासनाने रक्तदानासाठी आवाहन केले आहे. हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदभाव सेवाभावी संस्था, हेल्पिग हँडस ग्रुप व बी-प्रोफेशनल फिटनेसच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 52 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती अभय भरतीया यांनी दिली. शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार संतोष बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती फकीरा मुंढे, श्रीशैल्य स्वामी, जिल्हा काँग्रेस प्रवक्ता विलास गोरे, नगरसेवक राम कदम यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीच्या डॉ. दिपमाला पाटील, आश्विनी मुंढे, आत्माराम जटाळे, श्रीनिवास निर्मळ, गणेश देशमुख, नितीन हांडगे, संदीप घुगे यांनी मदत केली.
































































