लॉकडाऊन संपेपर्यंत बीडमधला अन्नदानाचा महायज्ञ सुरूच राहणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन झाल्यामुळे बीड जिल्ह्यात विविध कामांसाठी आलेले इतर राज्यातील नागरीक अडकून पडले आहेत.  त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी संतोष सोहनी यांनी मदतीला धावत आपल्या एमआएडीसी भागातील वैष्णो पॅलेस  मंगल कार्यालयात  अन्नदानाचा  मदतयज्ञ सुरु केला होता. सकाळची न्याहरी, दोन वेळचे जेवण, फळे गरजूंना देण्यात येतात. गोरगरिबांची अडचण लक्षात घेता हा अन्नयज्ञ लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू ठेवणार असल्याचे सोहनी यांनी सांगितले आहे. जवळपास 550 जणांना या अन्नयज्ञाचा लाभ मिळत आहे.