
नांदेडमध्ये बुधवारी सायंकाळी अबचलनगर भागातील 56 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. काही दिवसांपासून ती व्यक्ती आजारी होती. त्याला सुरुवातीला अन्यत्र उपचारासाठी ठेवण्यात आले होते. मात्र, बुधवारी त्रास वाढल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 झाली आहे. तर जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या 35 झाली आहे.



























































