
लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकून पडलेले जवळपास 1200 कामगार शुक्रवारी सकाळी 10 वाजता मध्य प्रदेशकडे रवाना होणार आहेत. थिवी स्टेशनवरुन त्यांना मध्यप्रदेशला नेण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. गोव्यातून कामगारांना घेऊन जाणारी ही पहिली ट्रेन आहे. कामगार ट्रेन मध्ये बसण्यासाठी येताना गर्दी होऊ नये, व्यवस्थित अंतर राखले जाईल यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त के.कुणाल, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून आणि सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे.थिवी रेल्वेस्थानका बाहेर कामगारांना रांगेत राहण्यासाठी आखणी करण्यात आली आहे.गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.























































