दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळला, नऊ रहिवाशांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गणराज सोसायटीमधील दुसऱ्या मजल्याच स्लॅब पहिल्या मजल्यावर कोसळल्याची धक्कादायक घटन शिवाई नगर येथे घडली आहे. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर 9 रहिवाशी अडकले होते. अग्निशमन दल, आपत्ती दल टीडीआरएफ जवान आणि आपत्त व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त बचावकार्य करत नऊ रहिवाशांची सुखरूप सुटका केली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेने जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आज सकाळी 9 वाजता शिवाई नगर येथील गजानन महाराज मठाशेजारील असलेल्या गणराज सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब पहिल्या मजल्यावर धाडकन कोसळला. ही इमारत तळमजला अधिक चार मजल्यांच असून इमारतीचे बांधकाम सुमारे 24 वर्षे जुने आहे.

यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

सूर्यकांत घाग, सुधा घाग, दीप्ती घाग, वेद घाग, प्रदीप् गराटे, प्रगती गराटे, प्रसाद गराटे, सरीस चौधरी आणि दत्त यांचा इमारतीमध्ये अडकलेल्यांत समावेश होता. या सर्वांन सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती आपत्त व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी यासीन तडवी यांनी दिली.