
पुणे विभागातील 1 हजार 359 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 532 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 986 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 187 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 128 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात 3 हजार 80 बाधीत रुग्ण असून 1 हजार 240 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 675 आहे. कोरोनाबाधित एकूण 165 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 119 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्ह्यात 121 कोरोना बाधीत रुग्ण असून 35 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 84 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात 275 कोरोना बाधीत रुग्ण असून 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 210 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात 38 कोरोना बाधीत रुग्ण असून 28 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 18 कोरोना बाधीत रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत पुणे विभागामध्ये एकुण 36 हजार 218 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 33 हजार 591 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 626 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 30 हजार नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 3 हजार 532 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
तसेच आजपर्यंत विभागामधील 96 लाख 11 हजार 214 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 15 लाख 86 हजार 99 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 327 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
10 मे रोजी परदेशातून एकूण 202 व्यक्तीचे विभागामध्ये आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.
तसेच 10 मे दु. 4.00 वा. पर्यंत पुणे विभागातून मध्यप्रदेशासाठी – 5, उत्तरप्रदेशासाठी – 2, उत्तराखंडासाठी -1, तमिळनाडूसाठी -1 व राजस्थानसाठी-1 अशा एकूण 10 रेल्वे रवाना झालेल्या आहेत. यामधून 11 हजार 329 प्रवासी रवाना करणत आलेले आहेत. तसेच 12 मे रोजी सायं 5.00 वा. सातारा येथून रेवा (म.प्र.) येथे 1 हजार 450 प्रवाशांसाठी तसेच सायंकाळी 6 वा. कोल्हापूर येथून नागोर (राजस्थान) येथे 1 हजार 460 प्रवाशांसाठी रेल्वे गाडया रवाना होत आहेत.



























































