जालना जिल्ह्यात गोवंशची कत्तल करणाऱ्या दोन खाटीकांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील कुरेशी मोहल्ल्यात गोवंश जनावरांची कत्तल करुन त्यांची विक्री करणाऱ्या दोन खाटीकांना अंबड पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली आहे. या खाटकांकडे मांसविक्रीचा परवाना नसल्याचे समोर आले आहे.

अंबड शहरातील कुरेशी मोहल्ल्यात खाटीक इमरान कादर कुरेशी याच्या राहत्या घरी गाय कापून तिच्या मांसाचे तुकडे केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी रात्रगस्तीचे कर्मचारी राठोड, तळेकर, होमगार्ड खालेद शेख, शेळके व दोन पंचासमक्ष मांसविक्रीच्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी विक्रीसाठी इमरान कादर कुरेशी व शाहरूख चाँद कुरेशी (दोघे रा. कुरेशी मोहल्ला, अंबड) मांस कापत असल्याचे आढळले. त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुग्रीाव चाटे यांच्या फिर्यादीवरुन दोन खाटीकांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.