
मुंबईसह देशभारात कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे सरकारने चौथा लॉकडाऊन जाहीर करून कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. मात्र मुंबईकर वारंवार गर्दी करून कोरोना आपले काहीही बिघडवू शकत नसल्याचा बेजबाबदारपणा दाखवत आहेत. ‘रेड झोन’मध्ये असलेल्या मुंबई केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वाहतुकीची परवानगी असताना मंगळवारी विले पार्ले येथे चक्क ट्राफिक जाम झाल्याने पोलिसांचीही भंबेरी उडाली. सकाळपासूनच हजारो वाहनांची लांबच लांब रांग या ठिकाणी लागली होती. यातीत अनेकांजवळ प्रवास करण्याचे सबळ कारणही नव्हते. या बेजबाबदार वाहनचालकांमुळे ट्राफिक जाममध्ये अनेक रुग्णवाहिकाही अडकून पडल्या. त्यामुळे बेजबाबदार वाहनचालकांबरोबरच ‘मुंबईकरांचे डोळे कधी उघडणार!’ असा सवाल निर्र्माण होत आहे.



























































