लातूरमध्ये बार फोडून  विदेशी दारु, बिअरच्या बाटल्या  पळवल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
liquor Liqueur
फोटो प्रातिनिधीक

लातूरमध्ये चोरट्यांनी बार फोडून विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्या पळवल्या आहेत. या प्रक्रणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल आहे.

लातूर तालूक्यातील मौजे मळवटी शिवारातील बार अज्ञात चोरट्यांनी फोडले. तब्बल 870 विदेशी दारु आणि बिअरच्या बाटल्या चोरुन नेण्यात आल्या आहेत. राजकुमार पाटील रा. मळवटी यांच्या मालकीचे यश बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट आहे. बारचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी  किचन रुमचे आणि गोडाऊनचे कुलूप तोडले. चोरांनी विदेशी दारु आणि बिअरच्या ७८० बाटल्या चोरून नेल्या आहे. एकूण 93 हजार 556 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.