
बिहारच्या एका क्वारंटाईन सेंटरमध्ये पाच वर्षीय बालकाला साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. बालक आणि त्याचे कुटुंबीय मुंबईहून आपल्या गावी परतले होते. त्यांना चार दिवसांपासून क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकारामुळे क्वारंटाईन सेंटरमधील असुविधा चव्हाट्यावर आले आहे.
मुंबईहून एक कुटुंब मुंबहून बिहारमध्ये आले होते. प्रवासी मजूर असल्याने त्यांना राज्य सरकारने गया जिल्ह्यातील एका शाळेत क्वारंटाईन केले होते. या शाळेत मजुरांच्या राहण्याची व्यवस्था केली होती पण ती निकृष्ट दर्जाची होती. आपल्या कुटुंबाला वेगळी खोली देण्याची मागाणी महिलेने केली होती. परंतु प्रशासनाने दिली नाही. बहुतांश लोक शाळेच्या छतावर झोपले होते. म्हणून महिलेने आपल्या मुलाला खाली जमिनीवरच झोपवले. सकाळी एक साप त्याच्याजवळ होता. सापाने बालकाला चावा घेतला होता. तेव्ह उपस्थितांनी त्या सापाला मारून टाकले. बालकाला जवळच्या इस्पितळात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.



























































