लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचे 6 रुग्ण वाढले, बाधितांची संख्या 71 वर पोहोचली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या 71 वर पोहोचली आहे. आज 6 रुग्ण वाढले असून जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये कोरोना पसरला आहे.

लातूर जिल्ह्यामध्ये आज जे 6  जण कोरोना ग्रस्त आढळून आले आहेत त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील मौजे शिराढोण तालुका कळंब येथील लातूरात उपचारासाठी आलेल्या एका महिलेचा समावेश आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील 30 वर्षांच्या पुरुषाचा समावेश असून तो मुंबई येथून आलेला आहे. लातूर तालुक्यातील बोरगाव काळे येथील एक सोळा वर्षाचा मुलगा पॉझिटिव्ह आला आहे. उदगीर तालुक्यातील मौजे चिमाची वाडी येथील 45 वर्षाचा पुरुष  पॉझिटिव्ह आला असून निलंगा तालुक्यातील मौजे कोराळी येथील 42 वर्ष वयाची महिला पॉझिटिव्ह आली आहे. निलंगा तालुक्यातील मौजे लांबोटा येथील 21 वर्ष वयाचा युवक ही पॉझिटिव्ह आला आहे.

लातूर जिल्ह्यातील 1022 जणांची स्वँब तपासणी आजपर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 71 रुग्ण कोरूना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. उदगीर तालुक्यातील 46 निलंगा तालुक्यातील सोहळा लातूर तालुक्यातील तीन जळकोट तालुक्यातील दोन अमदपुर तालुक्यातील एक चाकूर तालुक्यातील एक आणि रेणापूर तालुक्यातील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.