
उत्तर प्रदेशातील कानपूर मध्ये दारू पिऊन अडीचशे लोकांवर हल्ला करणाऱ्या एका शराबी माकडाला कानपूर प्राणिसंग्रहालय याने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कल्लू असे या माकडाचे नाव असून त्याला एका दारुड्या जादूगाराने पाळले आहे. जादूगार स्वतःसोबत कल्लूलाही दारूचे घोट पाजायचा. कल्लूच्या हल्ल्यात एका नागरिकाला जीवही गमवावा लागला आहे. आता कल्लूला त्याच्या उपद्व्यापी मर्कट लीलांसाठी आयुष्यभर पिंजऱ्यात बंद राहावे लागणार आहे.


























































