
गेल्या 24 तासात अमरावती जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे नवे 8 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 376 झाली आहे. आज सकाळी आलेल्या अहवालात 5 रुग्ण बडनेरा शहरातील आहे. यासोबतच दुपारी 4 वाजताच्या नव्या अहवालात बडनेरा येथील 42 वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्त आढळून आला आहे. तसेच गोपाल नगर येथील 52 वर्षीय पुरुष, सक्करसाद तीन महिन्याची महिला बालक,साबनपुरा येथील 29 वर्षाचा पुरुष कोरोनाग्रस्त आहे. सध्या बडनेरा शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे.


























































