भायखळ्यात एक हजार खाटांचे पालिकेचे कोरोना हेल्थ सेंटर सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 पालिकेचा ई वॉर्ड म्हणजे भायखळा येथे रिचर्डसन क्रुड्स या ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी तब्बल एक हजार खाटांचे सर्वसुविधायुक्त कोरोना हेल्थ सेंटर सज्ज झाले आहे. या ठिकाणी 300 बेड ऑक्सिजनची सुविधा असणारे राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

भायखळा हा एकेकेळी कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. मात्र कोरोना रुग्णामागे दहा ते 15 जणांचे तर काही केळा त्याहीपेक्षा अधिक क्लोज काँटॅक्ट क्वारंटाईन केल्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला आहे. या ठिकाणी लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांसाठी 700 खाटा आणि 300 ऑक्सिजन सुविधा असलेले कोरोना हेल्थ सेंटर महत्त्र्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती पाहणीनंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. यावेळी सहायक आयुक्त मकरंद दगडखैर उपस्थित होते.