
महानायक अमिताभ बच्चन यांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. चाहते जसे बिग बी यांच्याकर प्रेम करतात तसेच बिग बीदेखील आपल्या चाहत्यांची काळजी घेताना दिसतात. नुकतेच बिग बी यांनी सोशल मीडियाकर एक चित्र पोस्ट केले आहे. हे चित्र त्यांच्या एका दिव्यांग चाहत्याने रेखाटले असून आपल्या पायाच्या सहाय्याने चित्र काढणाऱया या कलाकाराचे त्यांनी कौतुक केले आहे.
आपल्या ट्किटर अकाऊंटवर चित्राचा आणि त्या कलाकाराचा फोटो पोस्ट करत बिग बी म्हणाले, ‘हा आयुष… दिव्यांग आहे…आपल्या पायाने त्याने हे चित्र रेखाटले आहे. त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेणे हे माझे भाग्य होते.’ मला हे चित्र भेट म्हणून दे असे त्यांनी पुढे म्हटले आहे. आयुषने रेखाटलेले हे चित्र गुलाबो सिताबो या चित्रपटातील आहे. हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राईमवर रिलीज झाला होता.



























































