टेन्शन वाढले! 81 देशांत कोरोनाची दुसरी लाट!! अमेरिका, इस्त्रायल, स्वीडन, आशिया, आफ्रिकेला सर्वाधिक धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगाला पडलेला कोरोनाचा विळखा कधी सुटणार याची प्रतीक्षा सुरू असतानाच कोरोनाची दुसरी लाट आल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. 200हून अधिक देशांत कोरोनाचा संसर्ग झाला असतानाच यातील 81 देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. अमेरिका, इस्रायल, स्कीडन, दक्षिण आशिया, मध्य पूर्की आशिया आणि आफ्रिकन देशांतील परिस्थिती आणखी चिंताजनक होणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयसेस यांनी दिला आहे.

कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनमधून या विषाणूचे उच्चाटन झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता चीनमध्येच कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळू लागले आहेत. करोनाचे 34 नके रुग्ण आढळले असून त्यातील 22 जण राजधानी बीजिंगमधील आहेत. त्यापाठोपाठ पाकिस्तानमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने काढत आहे. मागील 24 तासांत पाकिस्तानात 6604 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर 153 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ब्राझिलमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून कोरोना रुग्णांच्या एकूण आकडेवारीपेक्षा सात पट अधिक रुग्ण असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. ब्राझिलमध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 10 लाख 32 हजार 913 इतकी झाली आहे.

लॉकडाऊन हटवल्याचा परिणाम

जगभरात अनेक देशांत अनलॉक सुरू झाल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अमेरिकेतील वाॅशिंग्टन, न्यूयॉर्कमध्ये सोमवारपासून अनलॉक 2 सुरू होणार आहे. यामुळे सलूनसह अन्य दुकानेही उघडणार आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. अनलॉक सुरू झाल्यामुळे लोक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. लोक मास्कही योग्यरीत्या लावत नसल्यामुळे धोका अधिक वाढला आहे. गुरुवारी आलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाल्याचे डब्ल्य़ूएचओचे डॉ. टेड्रोस यांनी सांगितले.

  • जगभरातील करोनाबाधितांची संख्या 89 लाखांहून अधिक झाली आहे. त्यापैकी 4 लाख 67 हजार जणांचा मृत्यू झाला आहे तर 47 लाखांहून अधिक लोकांनी करोनावर मात केली असल्याचे ‘वर्ल्डोमीटर’ संकेतस्थळाने म्हटले आहे.
  • दक्षिण आफ्रिकेत दररोज एक हजारांहून अधिक करोनाबाधित आढळत आहेत. 19 दिवसांत करोनाबाधितांची संख्या दुप्पट.
  • चीनमध्ये करोनाचे 34 नवे रुग्ण
  • पाकिस्तानात एकाच दिवसात कोरोनाचे 153 मृत्यू