
पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे कार्यकारी अभियंता आनंदराव शिंदे यांचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. ते 54 वर्षांचे होते. विशेष म्हणजे मंगळवारपर्यंत ते कामावर हजर होते. दरम्यान, पालिकेच्या सेवेतील 75 कर्मचारी-कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे 50 वर्षांवरील कामगारांना कोविडचे काम देऊ नये अशी मागणी बृह्न मुंबई म्युनिसिपल इंजिनीयर्स युनियनचे कार्यकारी अध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी केली आहे. पालिकेने 55 वर्षांची मर्यादा 50 वर्षांपर्यंत खाली आणावी असेही राजाध्यक्ष यांनी म्हटले आहे.



























































