तीन महिन्यांनंतर आयफेल टॉवर पर्यटकांसाठी खुला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पॅरिस येथील जगप्रसिद्ध आयफेल टॉवर सुमारे तीन महिन्यांनी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर  दीर्घ काळ आयफेल टॉवर बंद राहण्याची ही दुसरी वेळ होती. अनेक देशांनी अनलॉकडाऊनची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे. फ्रान्स देशानेही लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणली आहे. आता आयफेल टॉवरमध्ये जाताना 11 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व पर्यटकांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. सध्यातरी टॉवरचा दुसरा मजला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांना लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करावा लागेल. जुलैपर्यंत लिफ्ट बंद राहील.