लातूर जिल्ह्यात 179 स्वॅबपैकी 143 निगेटिव्ह, 13 पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेत 29 रोजी 179 स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. 143 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 13 अहवाल पॉझिटिव्ह तर 11 अहवाल अनिर्णित आले. 12 जणांचे अहवाल रद्द करण्यात आले.

वैद्यकीय विज्ञान संस्थेचे एकूण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 42 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 3 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती झिंग्नाप्पा गल्ली, मोती नगर व हुसनाल जि. बिदर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. एका व्यक्तीची पुनर्तपासणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. औसा तालुक्यातील 6 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर उदगीर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

महानगरपालिकेकडून 29 व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 26 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित आला आहे, अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.

लातूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या 17 वर
लातूर जिल्ह्यातील सारोळा ता. औसा येथील कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या यामुळे 17 वर पोहोचलेली आहे. औसा तालुक्यातील मौजे सारोळा येथील 64 वर्ष वयाच्या रुग्णाला कोरोनामुळे उपचारासाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात 25 जून रोजी दाखल करण्यात आलेले होते. या रुग्णास दम्याचा आजारही होता. 29 जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे.