रत्नागिरी- छापा घालून 49 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू पकडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरीच्या शहर भरारी पथकाने मांडवी येथे छापा टाकून 49 हजार 400 रुपये किमतीची गोवा बनावटीची विदेशी दारु जप्त केली असून एका व्यक्तीला अटक केली आहे़. दारुचा साठा करुन लॉकडाऊनच्या काळात जादा दराने दारु विकण्याचे त्याचे मनसुबे उत्पादन शुल्क विभागाने उधळून लावले आहेत़.

मांडवी सदानंदवाडी येथे अरविंद चौगुले, वय 64 हा गोवा बनावटीची विदेशी दारु विकत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली़. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्याठिकाणी छापा घालून 49 हजार 400 रुपयांची दारु जप्त केली आणि चौगुले याला ताब्यात घेतले़.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे शहर निरिक्षक पांडूरंग पालकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली़. लॉकडाऊनच्या काळात जादा किमतीने दारु विक्री करण्याच्या उददेशाने दारुची साठवण केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे़. या कारवाईत दुय्यम निरीक्षक किरण पाटील, सहाय्यक निरिक्षक विजय हातीसकर, मलिक धोत्रे, विशाल विचारे, वैभव सोनावले, मानस पवार यांनी सहभाग घेतला.