मालवण : 144 दिवसांनंतर मच्छीमार्केट सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना पार्श्वभूमीवर 22 मार्चपासून 114 दिवस बंद असलेले मालवणचे मच्छीमार्केट शुक्रवार, 17 जुलैपासून खुले होणार आहे. आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनंतर पालिका प्रशासनाने मच्छीमार्केट खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.मच्छीमार्केट बंद असल्याने मत्स्यविक्रेत्या मार्केटबाहेर मासे किक्री करत होत्या. त्यामुळे बंद मार्केट खुले व्हावे, अशी मागणी विक्रेत्यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, नगरसेवक व पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती.

मुख्याधिकाऱ्यांचे मानले आभार

कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसह सर्व खबरदारी घेतली जाणार असेल तर मच्छीमार्केट खुले केले जाईल, असे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले. गेले महिनाभर पावसात भिजत मासे किक्री करणाऱ्या मत्स्य विक्रेत्या महिलांचा विचार करून मच्छीमार्केट खुले करण्याची मागणी मान्य केल्याबद्दल मत्स्य विक्रेत्या महिला संघ अध्यक्षा मनीषा जाधव व उपस्थित अन्य महिलांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.