पुढल्या वर्षी ऑलिम्पिक होणारच, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले तर पुढल्या वर्षी ढकलण्यात आलेले टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्याची आपत्ती निर्माण होऊ शकते अशी भीती मेडिकल एक्सपर्टकडून व्यक्त करण्यात आली असली तरी 2021 सालामध्ये होणारे टोकियो ऑलिम्पिक होणारच असा विश्वास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून (आयओसी) शुक्रवारी व्यक्त करण्यात आला. आयओसीचे सेशन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी टोकियो ऑलिम्पिकच्या यशस्वी आयोजनासाठी काय करता येईल यावरही चर्चा करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या नियमांचे आम्ही पालन करणार आहोत, असे आयओसीकडून यावेळी सांगण्यात आले.

यूथ ऑलिम्पिक आता 2026मध्ये
कोरोनामुळे आता युथ ऑलिम्पिकही पुढे ढकलण्यात आले आहे. याआधी 2022 सालामध्ये आफ्रिका खंडातील सेनेगल येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार होते, पण आता या स्पर्धेचे आयोजन 2026 सालामध्ये होणार आहे.