
जिल्ह्यातील लोणार शहरात कोरोनाचा अद्यापही शिरकाव झाला नाही. त्याचा शिरकाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी जनतेच्या व व्यापारच्या वतीने पाच दिवसाचा 22 जुलै ते 26 जुलै 2020 पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.
सर्वच ठिकाणी करणाचे रुग्ण आढळून येत असताना त्या ठिकाणी लॉकडाऊन ठेवण्यात आलेले आहे. लोणार तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले असताना लोणार शहरात अजूनही एकही रुग्ण सापडला नाही. भविष्यात त्याचा शिरकाव होऊ नये म्हणून खबरदारी साठी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगण्यासाठी व लोणार शहरात संसर्ग होऊ नये म्हणून आणि तालुक्यातील कोणाची चैन तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत जनता कर्फ्यू ठेवण्यासाठी तहसीलदार सैफन नदाफ, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, ठाणेदार रवींद्र देशमुख यांनी शहरातील राजकीय मंडळी व्यापारी मंडळी पत्रकार यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यामध्ये दिनांक 22 जुलै ते 26 जुलै 2020 रविवार पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



























































