
आई कोरोनाबाधित असल्याचे निदान झाल्यानंतर 23वर्षीय मुलाने रोकडोबावाडी येथे घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना 15 जुलैला घडली.
नाशिकरोडच्या रोकडोबावाडीतील महिला कोरोनाग्रस्त आढळल्याने समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात क्वॉरंटाईन आहेत. त्यांचा मुलगा 15 जुलै रोजी त्यांना भेटण्यासाठी गेला होता. त्याच दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास त्याने घरी गळफास घेतला. वडील व बहिणीने उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी तपासून मृत घोषित केले, अशी माहिती उपनगर पोलिसांनी दिली. नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तविली जात आहे.



























































