विना सिम कार्ड फोन वापरा; व्होडाफोन-आयडियाची ई-सिम सव्र्हिस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आता आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणत्याही कंपनीचे सीमकार्ड न घातल्याशिवाय देखील त्या कंपनीची सेवा वापरता येणार आहे. तुम्हाला वाटत असेल की, फोनमध्ये कोणत्याही नंबर वापरासाठी सीमकार्ड घालणे आता गरजेचे राहणार नाही. जगभरात आता अनेक कंपन्यांनी ई -सिम सव्र्हिस आणली असून व्होडाफोन-आयडियाने देशात प्रथमच पोस्ट पेड युजर्संसाठी ई-सव्र्हीस बाजारात आणली आहे.

अ‍ॅपल फोनसह काही मोजक्या फोनमध्येच या ई-सिमचा वापर करता येऊ शकणार आहे. सध्या मुंबई, दिल्ली आणि गुजरातमधील पोस्टपेड युजर्ससाठी ही सुविधा देण्यात आली आहे. हार्ड अँड डिव्हाईसेज मध्ये ई -सिम सव्र्हीस देण्यात आली आहे. एक इंटिग्रेटेड सिम चिप म्हणून काम करणार आहे. यासाठी वेगळे सीमकार्ड घेण्याची गरज नाही.