सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ, आता इतक्या दराने होतेय विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे सध्या सोन्यात गुंतवणूक वाढत असल्याने सोने पन्नास हजाराच्या घरात पोहोचले आहे.

जागतिक बाजारातील तेजीमुळे वायदे बाजार आणि सराफा बाजारातील सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 52 हजारांवर असलेलं सोनं 53 हजार 429 रुपये इतकं झालं आहे. येत्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात हाच भाव 2000 डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जगावरील कोरोनाचे वाढते संकट, कमजोर होणारी डॉलरची स्थिती, अमेरिका-चीन तणाव यामुळे गुंतवणूकदार सोन्या-चांदीच्या गुतंवणुकीकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. गेल्या चार महिन्यात चांदीच्या किंमती दुपटीने वाढल्या आहेत. आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सोन्या-चांदीतील वाढती तेजी बघता 2021 च्या अखेरीपर्यंत आतंरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती 73 हजार रुपये प्रती 10 ग्रॅमपर्यंत पोहचतील, अशी शक्यता बँक ऑफ अमेरिकेने व्यक्त केली आहे.