कोल्हापूरात कोरोनाचा कहर सुरुच, 218 नवे रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यात आजही कोरोनाचा कहर सुरुच राहिला.कोल्हापुर, इंचलकरंजी शहरासह करवीर,हातकणंगले आदी तालुक्यातही सामुहिक संसर्गांत वाढ होत असल्याने,चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.आज सकाळी 10 पर्यंत तब्बल 218 नवे कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले.यामध्ये एक अँन्टीजेन चाचणीच्या रुग्णाचाही समावेश आहे.

यात 5 जणांचा दुसराही अहवाल पॉझीटिव्ह आला आहे.त्यामुळे जिल्ह्यात आजअखेर एकूण बाधीतांची संख्या 5 हजार 799 वर पोहोचली आहे.चोवीस तासांत तब्बल 193 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला.आतापर्यंत 2 हजार 320 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर आणखी 9 व आतापर्यंत एकूण 162 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे सध्या जिल्ह्यात एकूण 3 हजार 317 बाधीत रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन मिळाली.

सध्या आजरा-122, भुदरगड-121, चंदगड-360, गडहिंग्लज-230, गगनबावडा-11, हातकणंगले- 471 ,कागल-106, करवीर-637, पन्हाळा-249, राधानगरी-207, शाहूवाडी-268, शिरोळ-205, नगरपरिषद क्षेत्र- 1 हजार 236, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-1 हजार 499 असे एकूण 5 हजार 722 आणि इतर जिल्हा व राज्यातील 77 असे मिळून एकूण 5 हजार 799 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

प्रशासकीय यंत्रणेतही कोरोनाचा शिरकाव

जिल्हा परिषद,सीपीआर रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात यापूर्वी कोरोनाचा शिरकाव झाला आहे.तर काल निवासी उपजिल्हाधिकारी यांचा अहवाल पाॅझीटिव्ह आला असतानाच पेठवडगाव,शाहुपुरी, राजारामपुरी पोलिस ठाण्यातील अधिकारीही पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणेतही आता चिंतेचे वातावरण पसरले आहे.