
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशअर्ज 1 ऑगस्ट सकाळी 11 वाजल्यापासून भरता येणार आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीयभूत पद्धतीने ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार असून किमान दहावी पास अथवा नापास विद्यार्थी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.
राज्यातील सर्व आयटीआय संस्थांमध्ये 1 ते 14 ऑगस्टदरम्यान रोज सकाळी 10 ते 11 या वेळेत मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. प्राथमिक गुणवत्ता यादी 16 ऑगस्टला जाहीर होणार असून राज्यभरात विविध अभ्यासक्रमाच्या एकूण 1 लाख 45 हजार 632 जागा उपलब्ध आहेत.
प्रवेशाची वेबसाईट https://admission.dvet.gov.in
किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणिक अर्हता धारण करणारे 14 वर्षावरील विद्यार्थी आयटीआय प्रवेशासाठी पात्र आहेत.
अशी असेल प्रवेशप्रक्रिया
ऑनलाईन प्रवेशअर्ज करणे – 1 ते 14 ऑगस्ट
पहिल्या प्रवेशफेरीसाठी प्राधान्यक्रम देणे – 2 ते 14 ऑगस्ट
प्राथमिक गुणवत्ता यादी – 16 ऑगस्ट
हरकती नोंदविणे – 16 ते 17 ऑगस्ट
अंतिम गुणवत्ता यादी – 18 ऑगस्ट
पहिली प्रवेश फेरी – 20 ऑगस्ट
प्रवेश घेणे – 21 ते 26 ऑगस्ट
दुसरी प्रवेश फेरी – 30 ऑगस्ट
प्रवेश घेणे – 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर
तिसरी प्रवेश फेरी – 7 सप्टेंबर
प्रवेश घेणे – 8 ते 11 सप्टेंबर
चोथी प्रवेश फेरी – 15 सप्टेंबर
प्रवेश घेणे – 16 ते 19 सप्टेंबर
नव्याने प्रवेशअर्ज भरणे – 1 ते 19 सप्टेंबर
समुपदेशन फेरी – 21 सप्टेंबर



























































