कणकवलीत उड्डाणपूलाचा स्लॅब कोसळणे ही घटना म्हणजे ठेकेदाराचा निष्काळजीपणा आहे. महामार्ग ठेकेदार यांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे.त्यामुळे संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे,तोपर्यंत कणकवली शहरात ठेकेदाराचे काम चालू करू देणार नाही, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
कणकवली उड्डाणपूल कोसळल्यानंतर खा.विनायक राऊत यांनी पाहणी केली.यावेळी तांत्रिक सल्लागार एन.के.सिंग , सचिन सावंत, डॉ.प्रथमेश सावंत, राजू राठोड, नगरसेवक रुपेश नार्वेकर,सुजित जाधव, अनिस नाईक, उमेश वाळके, रमेश चव्हाण, महामार्ग प्राधिकरण अधिकारी व दिलीप बिल्डकाँनचे अधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण कामाचे ऑडिट झाल्या शिवाय एकही इंचाच काम करू,नका अशा सूचना संबंधित ठेकेदाराला खा.विनायक राऊत यांनी दिल्या.
महामार्ग ठेकेदाराचा निष्काळजीपणा चालणार नाही, काम करताना वरिष्ठ टेक्निकल अधिकारी उपस्थित राहिले पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलणं झालं असून एवढ्या मोठ्या ब्रिजचं काम सुरु असताना अशा गोष्टी होणं म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळल्या सारखं आहे.ते यापुढे सहन केलं जाणार नाही.तसेच जी साईट गटार बांधली आहेत त्याच काम हि निकृष्ट दिसत असून पुन्हा ते काम पुन्हा करण्यात यावे,असे खा.विनायक राऊत यांनी सांगितले.



























































