महानायकाची कोरोनावर मात, चाहत्यांचे मानले आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचे महानायक ‘बिग-बी’ अमिताभ बच्चन यांनी कोरोनाला हरवले आहे. त्यांची कोरोना चाचणी रविवारी निगेटिव्ह आल्याने नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणार्‍या लाखो चाहते आणि नानावटी रुग्णालयाचे डॉक्टर्स-नर्सेस यांचे अमिताभ यांनी ट्विटरवर ‘धन्यवाद’ मानून आभार व्यक्त केले आहेत. 20 दिवसांच्या उपचारानंतर बिग बी कोरोनाकर यशस्वीरीत्या मात करून घरी  सुखरूप परतले.

अभिषेक नानावटीत

अमिताभ कोरोनामुक्त झाले असले तरी अभिनेता अभिषेक याच्यावर मात्र नानावटी रुग्णालयात उपचार सुरूच आहेत. खुद्द अभिषेक यानेच ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.