मोदींनी संविधानिक शपथ मोडली, एमआयएमचे ओवैसी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी झाल्याबद्दल देशभरात आनंद क्यक्त होत असताना एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या भेटीवर टीका केली. ‘हिंदुस्थान एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी उपस्थित राहून मोदींनी संविधानिक शपथ मोडली आहे. आजचा दिवस म्हणजे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेची हार असून, हिंदुत्वाचा विजय आहे.’ अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘मोदींनी आज भावनिक झाल्याचे म्हटले. मीसुध्दा तितकाच भावनिक झालो आहे. कारण मी एकात्मतेकर विश्वास ठेवतो. मिस्टर पंतप्रधान, मी भावनिक झालो कारण त्या ठिकाणी 450 वर्षे एक मशिद उभी होती.’ असे ओवैसी यांनी म्हटले आहे.