वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प; चाकरमानी लटकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले. चिपळूण तालुक्यातील वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडताच चिपळूण शहरात पाणी शिरले.

वशिष्ठी नदी आणि शिवनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी अडकले आहेत. पावसाचा जोर वाढत असून पुराचे पाणी चिपळूण शहरातील बाजारपूल, चिंचनाका, जुने एस.टी.स्टॅण्ड परिसरात शिरले असून चिपळूणला पुराचा धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी तालुक्यालाही पावसाने झोडपून काढले आहे.

गणेशोत्सव पाच दिवसांवर येऊन ठेपल्याने चाकरमानी त्यांच्या गावाकडे जात आहेत. यंदा कोरोनामुळे अनेक बंधनं असतानाही कोकणातील चाकरमानी मात्र गावी जाताना दिसत आहेत. खासगी वाहने, एसटीने चाकरमानी कोकणात पोहचत आहेत.