
आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात आरोग्य चांगले राखणे महत्वाचे आहे. अनेकदा खाण्यापिण्याची सवयी, साफसफाई याकडे दुर्लक्ष केल्यास याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी कायम पुढील काही टिप्स नेहमी लक्षात ठेवा…
1. बाहेर फिरून आल्यावर किंवा कामावरून आल्यावर जेवणाआधी, टॉयलेट-बाथरूमला जाऊन आल्यानंतर हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवा.
2. घरातील साफसफाई नियमित करत जा. स्वयंपाक घर, झोपण्याची जागा, पाण्याची टाकी नेहमी स्वच्छ ठेवा. चादर, बेडशिट यांना ऊन दाखवत जा.
3. जेवण तयार करण्याआधी भांडी स्वच्छ धुवा. तसे जेवणानंतर त्यावर खरकटे राहून बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता असल्याने व्यवस्थित धुवा आणि पुसून ठेवा.
4. आहारात ताज्या भाज्या, फळे, पालेभाज्या यांचा वापर करा. तसेच कोशिंबीर, सलाड याचाही नियमित वापर करा. शिळे,जास्त तेलकट खाणे शक्यतो टाळा.
5. आहारात दूध, दही, डाळी, हिरव्या भाज्या, मोड आलेले कडधान्य यांचा उपयोग करा. फ्रीजमध्ये शिजवलेले आणि कच्चे पदार्थ वेगवेगळे ठेवा.
6. जेवण बनवताना सोयाबीन सनफ्लॉवर, मक्का याच्या तेलाचा वापर करा. तसेच नियमित एकाच प्रकारचे तेल वापरा.
7. जेवनात साखर आणि मीठ यांचा उपयोग कमी करा. रात्रीचे जेवन नेहमी हलके असावे आणि झोपण्यापूर्वी दूध घेतल्यास उत्तम.
8. नियमित व्यायाम, योगासने करा आणि ताणतणाव यापासून दूर रहा. दररोज किमान 30 मिनिटे स्वतःच्या आरोग्यासाठी द्या.
9. 40 ते 45 वर्षांनंतर नियमित डॉक्टराकडे जाऊन तपासणी करा. ताणतणाव यापासून दूर रहा आणि मनोरंजनाच्या गोष्टी करा.



























































