
कोझिकोड दुर्घटनेतील मृतांच्या वारसाला दुबईतील अल अदील ट्रेडिंग कंपनीचे मालक आणि मसालाकिंग डॉ. धनंजय दातार 20 लाखांचा मदतनिधी देणार आहेत. वैमानिक, सहवैमानिकासह प्रवाशांना सामाजिक जबाबदारी म्हणून ते ही मदत करणार आहेत. या दुर्घटनेत एकूण 18 जण मृत्युमुखी पडले होते.
मदतीविषयी डॉ. दातार म्हणाले, दुबईतून हिंदुस्थानात परतणाऱ्या या विमानातील अनेक प्रवाशांचे रोजगार गेले होते. अनेकांच्या व्हिसाची मुदत संपल्यामुळे मायदेशी परत येत होते. अनेकांपुढे आर्थिक विवंचना होत्या. अशा स्थितीत मृत प्रवाशांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांवरील आर्थिक भार कमी व्हावा, म्हणून मी हा निर्णय घेतला आहे.




























































