तेलंगणातील जलविद्युत प्रकल्पात भीषण आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू, तीन जणांचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणा येथील एका जलविद्युत प्रकल्पातील पॉवर हाऊसला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. या आगीत 9 जण अडकले होते. त्यापैकी 6 जणांचे मृतेदह हाती लागले असून उर्वरित तीन जणांचा शोध सुरू आहे.

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सीमाभागातील श्रीशैलम हा प्रकल्प आहे. येथील एका भूमिगत पॉवर हाऊसा रात्री भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच एनडीआरएफची एक तुकडी तिथे त्वरित दाखल झाली. या तुकडीने दहा जणांची तिथून सुटका केली. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. तर अडकलेल्या नऊ जणांपैकी सहा जणांचे मृतदेह हाती लागले असून तीन जण अद्याप बेपत्ता आहेत.

तेलंगणाचे मंत्री जगदीश्वर रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, आग लागताच पॉवर हाऊसची वीज पुरवठा बंद करण्यात आला होता. या बचावकार्यासाठी कोळसा खाणीत काम करणाऱ्या तुकडीची मदत घेतली जात आहे, अशी माहिती रेड्डी यांनी दिली आहे.