
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राम जन्मभूमीच्या अयोध्येतील पौराणिक कुंडांचा इतिहास करणार आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटनला फायदा होणार आहे. केंद्र सरकारचा पर्यटन विभाग आणि राज्य सरकार मिळून या कुंडांचा विकास करणार आहे. यासाठी 70 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या प्रकल्पासाठी मंडल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पाडली. अयोध्या नगरीतील जे पौराणिक कुंड आहेत जे सध्या जीर्ण आणि भग्न अवस्थेत आहे त्यांचा विकास करण्याची चर्चा या बैठकीत झाली.
अयोध्याचे आमदार वेद प्रकाश गुप्ता म्हणाले की सुरूवातीला दशरथ कुंड, अग्नि कुंड, सीता कुंड, विद्या कुंड, गणेश कुंड आणि हनुमान कुंडांचा विकास करण्याची प्रस्ताव होता. आता हा प्रस्ताव वाढवून इतर कुंडाचांही विकास करण्याचा प्रयत्न आहे. अयोध्या एक पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध व्हावे असा उद्देश या प्रकल्पामागे असल्याचे आमदार प्रकाश यांनी सांगितले.

























































