हृदय सांभाळा, वाचा ‘या’ काही महत्त्वाच्या टीप्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी जास्त प्रमाणात फास्टफुड, तेलकट, मसालेदार पदार्थांचा आहार टाळणे.
– आहारात भात, पोळी, भाकरी आदी योग्य प्रमाणात असावे. फळे, भाज्या आणि पालेभाज्या भरपूर प्रमाणात घ्याव्यात. साय, लोणी, मटण, पामतेल, खोबरेल तेलात स्निग्ध पदार्थ जास्त असतात. त्यावर नियंत्रण ठेवावे. मांसाहार कमी ठेवावा. दूध, दुधाचे पदार्थ कमी करावे. डालडा तुपाचे सेवन टाळावे. बेकरीचे पदार्थ टाळावे.
– हार्ट ऍटॅकपासून वाचण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे व्यायाम. दररोज व्यायाम केल्याने हृदयासंबंधीचे आजार कमी होतात. जर व्यायाम करणं शक्य नसेल तर दररोज काही वेळ चाला. त्याचबरोबर पळणे, पोहणे, सायकल चालविणे आदी व्यायामही करावेत.
– सुका मेवाही आरोग्यासाठी उत्तम आहे. हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी बदाम, पिस्ता अत्यंत फायदेशीर ठरते. हे कोलेस्ट्रॉल कमी करतं. यामध्ये असणारे गुणधर्म हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात.
– लिंबू, मोसंबी, संत्री, आवळा अशा ‘सी’ व्हिटॅमिनयुक्त फळांचे रस हृदयासाठी उपयुक्त ठरतात. त्यामळे कोलेस्ट्रॉल कमी होते.
w टोमॅटोचा रस हृदयासाठी फायदेशीर ठरतो. जे लोक आहारात नियमितपणे टोमॅटो खातात त्यांना हृदयविकार होण्याचा धोका म्हणूनच कमी असतो.
w जंकफूडपासून दूर राहावे. त्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने हृदयाला धोका निर्माण होतो.