
विदर्भात रविवारी(४ आॅक्टोबर) एक हजार ६०८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली़ नागपुरात ६१७, अकोला २५, वाशीम ६८, अमरावतीत १३८, बुलडाणा १३८, यवतमाळ २२, गडचिरोली येथे १११, भंडारा १२६, गोंदिया १२०, वर्धा येथे ८४ तर चंद्रपुरात १५९ ने वाढ झाल्याने बाधितांची संख्या एक लाख ५६ हजार ७४० इतकी झाली आहे.
एक लाख २६ हजार ८९५ कोरोनामुक्त व चार हजार २०२ रुग्णांचा बळी गेल्याने सध्या २५ हजार ६६४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत़नागपुरात ८१ हजार ४६१ रुग्णांची नोंद असून ६८ हजार ३७७ कोरोनामुक्त, दोन हजार ६२३ व्यक्तींचा बळी गेला आहेत़ १० हजार ४६१ कोरोना रुग्ण भरती आहेत़ अकोला जिल्ह्यात सात हजार ६२० रुग्णांची नोंद असून सहा हजार ५१६ कोरोनामुक्त, २४४ रुग्णांचा मृत्यू तर ८६० रुग्ण उपचार घेत आहेत़ अमरावतीत १४ हजार ५ रुग्णांची नोंद असून ११ हजार ५५५ कोरोनामुक्त, ३११ रुग्णांचा बळी गेल्याने सध्या दोन हजार ११९ रुग्ण भरती आहेत़ यवतमाळ जिल्ह्यात आठ हजार ७४८ रुग्णांची नोंद आहेत़ सात हजार २२० कोरोनामुक्त व २७२ रुग्णांचा बळी गेल्याने एक हजार २३० रुग्ण भरती आहेत़ बुलडाणा येथे सात हजार ६४८ रुग्णांची नोद असून सहा हजार ५१४ कोरोनामुक्त व ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहेत़ एक हजार ३५ रुग्ण भरती आहे़ वर्धा जिल्ह्यात पाच हजार १४ रुग्णांची नोंद असून दोन हजार ९२३ कोरोनामुक्त व १३९ रुग्णांचा बळी गेल्याने दोन हजार २३ रुग्ण भरती आहेत़ चंद्रपुरात ११ हजार २६ रुग्णांची नोंद असून सात हजार ५५८ कोरोनामुक्त व १५८ रुग्णांचा बळी गेल्याने सध्या तीन हजार ३०१ रुग्ण भरती आहेत़ भंडारा जिल्ह्यात पाच हजार ९९० रुग्णांची नोंद असून चार हजार ११२ कोरोनामुक्त व १३६ रुग्णांचा बळी गेल्याने एक हजार ७४२ रुग्ण भरती आहेतग़डचिरोलीत तीन हजार १९७ रुग्णांची नोंद आहेत़ दोन हजार ३३२ कारोनामुक्त व २१ रुग्णांचा बळी गेल्याने सध्या ८४४ रुग्ण भरती आहेत़ वाशीम जिल्ह्यात चार हजार ५७० रुग्णांची नोंद असून ९५ रुग्णांचा मृत्यू तर तीन हजार ८८८ कोरोनामुक्त झाल्याने ५८६ रुग्ण भरती आहे.
गोंदियात सात हजार ४६१ रुग्णांची नोंद असून पाच हजार ९०० कोरोनामुक्त व १०४ रुग्णांचा मृत्यू झाला़ आता एक हजार ४६३ बाधितांवर उपचार सुरू आहे़



























































