
राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सोशल मीडिया समन्वयक यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती यादी प्रसिध्दीसाठी देण्यात आली. या नियुक्त्या तात्पुरत्या स्करुपात असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयांच्या कामाचा आढावा घेऊन त्या कायम केल्या जाणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.
अनघा आचार्य, मयुर कांबळे, पराग मोहिते, भुमीष सावे, अमीत भद्रीचा, अनुज म्हात्रे, अमित पंडित, परिमल देशमुख, अश्विनी चव्हाण, आशिष पढय़ार, पूजा कट्टी, सचिन सावंत, सचिन ककडे, देवेश ठाकरे, शर्करी गवंडे-जालमकर, दिपाली प्रभू, अयोध्या पोळ, नितेश विनोद ठाकूर, शुभम राजपूत, गणेश लक्ष्मण काघ, विशाल मैशेरी यांच्यावर सोशल मीडिया समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


























































