
लातूर जिल्ह्यातील ५८१ रुग्णांच्या तपासणीमध्ये ११० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९२७१ झालेली आहे.
ऑक्टोबर महिन्यात लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. आज जिल्ह्यातील ५८१ जणांच्या तपासणीमध्ये ११० जण कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आलेले आहे. ११५ आरटीपीसीआर टेस्टमध्ये २८ जण पॉझिटीव्ह आढळून आले तर ४६६ जणांची रॅपीड अॅन्टीजीन टेस्टमध्ये ८२ जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९२७१ वर पोहोचलेली आहे.
जिल्ह्यात सध्या १३५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये तब्बल ७३५ जण घरी उपचार घेत आहेत. उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे तर आजपर्यंत ५६४ जणांचा मृत्यू उपचारादरम्यान झालेला आहे. तर १७३५१ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेले आहेत.



























































